गोल पोस्ट महाराष्ट्र सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये: एकाच दिवशी आढळले सहा पॉझिटिव्ह

सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये: एकाच दिवशी आढळले सहा पॉझिटिव्ह

सोलापूर : सोलापुर शहरात करोनाबाधितांची संख्या आता २१ वर पोहोचली आहे. सोमवारी (दि.२०) रोजी नवीन मिळालेल्या ६ रुग्णांपैकी बापूजीनगर, आयोध्या नगरी येथील प्रत्येकी १ तर कुर्बानहुसेन नगर आणि पाच्छा पेठ येथील प्रत्येकी २ रुग्ण आहेत. अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापूर शहरातील सर्व भागात पोलीस प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांनी या भागात गस्त देखील वाढवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं पोलिसांकडून वारंवार बजावण्यात येत आहे. तसेच सोलापुरमध्ये कोरोना संशयितांची संख्या आत्तापर्यंत ७७८ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. यात ५६९ जणांचे अहवाल आत्तापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यातील ५४८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे तर २१ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
रविवारपर्यंत सोलापुरात १५ रुग्ण मिळाले होते. त्यात एकदम सहाने संख्या वाढली आहे. यात चार पुरुष दोन महिलांचा समावेश आहे. एकूण २१ पैकी २ रुग्णांचा मृत्यू यापूर्वीच झाला आहे तर १९ जणांवर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अद्यापही २०९ जणांचा करोना चाचणी अहवाल प्राप्त झालेला नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version