श्रीरामपूर परिसरातील “तो” बिबट्या अखेर जेरबंद

श्रीरामपूर : गेल्या दोन महिन्यापासून गळनिंब, फत्याबाद कुरणपुर, पिंपळगाव कडित, चांडेवाडी, ममदापुर परिसरात बिबट्याने,चांगल्या प्रकारे धुमाकुळ घातला आहे. यात गळनिंब येथिल येथिल वृषाली मारकड या ३वर्षा च्या चिमुरडी हल्ला करुन ठार केले. त्यानंतर दोन दिवसा पिंपळगांव फुणगी येथिल क्षेया जाधव या ३ वर्षाच्या मुलीचा तोंडाचा चावा घेतला.
तसेच चांडेवाडीमध्ये अनेक वेळा दिवसा बिबट्याने दर्शन दिले. या सर्व घटनेने वनखात्याने सतर्क राहुन संपुर्ण भागात १५ पिंजरे लावले. यामध्ये आता पर्यंत वनविभागाने चार बिबटे पकडले. आज कडित, येथिल मछिन्द वडितके यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या एक महिन्यापासुन पिंजरा जवळ घिरट्या मारत होता. पण अडकल्या जात नव्हता, ही बाब वनरक्षक गोसावी यांनी लावलेल्या टॉप कॅमेऱ्यात निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ या पिंजरात मास व कोंबडी ठेवली. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
ही कामगिरी वनपरिक्षेत्र वनरक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोसावी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांना वनरक्षक एम.एस. इंगळे, वनरक्षक विकात बुराडे, वनरक्षक सुधाकर घोडके, वनमजुर बि.जी. खराडे, आर.पी. घोडके, आर.पी. शेळके, वाहन चालक संजय पंढरे यांनी विशेष मदत केली.