दोन अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर, ३ जुलै २०२३ : दोघी अल्पवयीन बहिणी रविवारी सायंकाळी तिसगाव बस स्थानकात उभ्या असताना आरोपीने त्यांची छेड काढत त्यांना मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईलही तोडला होता.या अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. रफिक उर्फ लाल्या मुनीर पठाण असे २८ वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे या मागणीसाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटना रात्री पोलीस ठाण्यातच ठाण मांडून बसल्या होत्या. या प्रकरणामुळे तिसगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

बसस्थानकातील बहिणींच्या छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. यामुळे पुढील अनुचित घटना टळली.सदर आरोपीवर याआधीही छेडछाडप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी स्थानिक पातळीवर वाद मिटवण्यात आला होता. आता पुन्हा आरोपीने छेडछाड केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा