आठवीच्या पुस्तकात भगतसिंह, राजगुरुंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख

पुणे, दि. १७ जुलै २०२०: आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये चूक असल्याचा आरोप भारतीय ब्राह्मण मंडळाने केला आहे. या पुस्तकामध्ये भगतसिंग, राजगुरु आणि कुर्बान हुसेन हे इंग्रजांशी लढताना फासावर गेले असा उल्लेख आहे. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याला आक्षेप घेतला आहे. वास्तविक या वेळेस जे तिघेजण फासावर गेले होते त्यातील सुखदेव यांचे नाव यातून वगळण्यात आले आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव अशी ही तीन नावे असून त्यामध्ये वेगळे नाव घुसवण्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करले हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. परंतु आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या या धड्यात भगतसिंह, राजगुरु यांच्यासह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचे लिहिले आहे. राज्य शिक्षण प्रसारक मंडळ कडून पुस्तकाची छपाई करताना ही छपाईतील चूक आहे की जाणीवपूर्वक सुखदेव यांचे नाव वगळून तेथे दुसरे नाव टाकण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे पुस्तकातील मजकूर

“देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?” “बरोबर आहे” मुले म्हणाली.
एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते” मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी… असा मजकूर या पुस्तकातील एका धड्यांमध्ये आला आहे यामध्ये सुखदेव यांच्या ऐवजी कुर्बान हुसेन यांचे नाव वापरले गेले आहे.

दरम्यान, सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे. “आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील चूक ही ‘गाढव चूक’ असून निंदनीय आहे. हे पुस्तक त्वरित मागे घ्यावे आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा” असे दवे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा