धक्कादायक संशोधन समोर, कोरोनामुक्त झालेल्या ९०% रुग्णांचे फुफ्फुस खराब….

चीन, ९ ऑगस्ट २०२०: चीनने कोरोना जगाला दिला आणि माणसाच्या आस्तित्वाला हा व्हायरस संपवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर संपुर्ण जगभरात कोट्यावधी लोक याच्या विळख्यात आले आहेत. लाखोंनी आपला जीव गमवला आहे. असे आसताना या विषाणुवर संशोधक अजूनही शोध करत आहेत. ज्यामुळे अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. असाच एक रिसर्च समोर आला आहे. कोरोना विषाणु हा नाक, घश्या नंतर सरळ फुफ्फुसांना परिणाम करतो हे आधीच सर्वांना माहिती आहे. पण, यात आणखी एक संशोधन समोर आले आहे. कोरोनातून बरे झालेल्या ९०% रुग्णांचे फुफ्फुसे हि खराब झाल्याची धक्कादायक माहिती कोरोनाचा जन्मदाता चीनने दिली आहे.

वुहानमधल्या कोरोनामुक्त झालेल्या १०० रुग्णांवर संशोधन केलं गेलं, या रुग्णांचं सरासरी वय ५९ वर्ष होतं. यामधल्या ९०% रुग्णांची फुफुसं पूर्णपणे बिघडण्याच्या मार्गावर असल्याचं समोर आलं. या रुग्णांचं फुप्फुसाचं व्हेंटीलेशन आणि गॅस एक्सचेंट फंक्शन योग्य पद्धतीनं काम करत नाहीये. जिथे एक सामान्य व्यक्ती ६ मिनिटांत ५०० मीटरहुन अधिक चालतो, तिथे कोरोनातून बरा झालेल्या व्यक्ती ४०० मीटरही चालू शकत नाही काही रुग्णांना बरे होऊन ३ महिने उलटले तरी त्यांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज लागते तर १०० मधल्या १० रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज संपुष्टात आल्याचं ही या संशोधनात समोर आलंय.

या संशोधनामुळे कोरोनातून बरे होणारे रुग्ण हे पुर्णपणे ठणठणीत न होता, त्यांना यासाठी अनेक महिन्यांचा कालावाधी लागत आहे. तर त्यांचे फुफ्फुसे हि कार्यपद्धतीत कायमची आता अशीच राहतील असे वाटत आहे. तर कोरोना विषाणुला अनेक नगरिक हे सध्या साधा विषाणु म्हणून बघायला सुरवात करत आहेत. तसे न करता योग्य ती खबरदारी घेत या पासून लस येई पर्यंत स्वत:ची व कुंटूबाची काळजी घेऊन राहणे महत्वाचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा