जेजूरीत लोकांचा निष्काळजीपणाचा कळस! बँके बाहेर केली मोठी गर्दी

पुरंदर, दि. ३० जून २०२०: जेजुरीतील महाराष्ट्र बँकेमध्ये शासकीय योजनेसाठी खाते सुरू कडण्यासाठी लोकांची प्रचंड झुंबड उडाली होती. यात सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. पण, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने आपल्या सहकाऱ्यांसह तेथे वेळीच पोहोचले व त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत जमावाला पूर्णपणे पांगवले.

आज पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशी पार गेली आहे . ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यातील सासवडसह वेगवेगळ्या गावांमध्ये असून, कोरोना आपल्या जवळ येऊन ठेपला आहे. शेजारी सासवड मध्ये कोरोना रूग्ण संख्येने चिंता वाढली आहे. आता प्रश्न असा आहे की, लोकांचे वर्तन कधी सुधारणार ? लोकांना परिस्थितीचे गांभीर्य समजणार आहे का? प्रत्येकवेळेस पोलीस यंत्रणेवर अशी वेळ येऊ न देणे. हे पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांसह, जेजुरी वासीयांचे कर्तव्य नाही का?

कोरोना रोगाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे, सर्व नागरिकांनी गर्दी टाळली पाहिजे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडत असताना मास्क वापरला पाहिजे, विनामास्क कोणी आढळून आल्यास कारवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळलेच पाहिजे. असे असताना अनेक लोक सार्वजनिक ठिकाणी येण्याचे टाळत नाहीत. बँक व इतर सरकारी कार्यालयात सर्रास लोक विना मास्क जाताना दिसून येतात. बँक व इतर सरकारी कार्यालयात दर्शनी भागात सॅनिटायझर ठेवणे गरजेचे आहे. मात्र कर्मचारी स्वत: जवळ किंवा टेबल वर ठेवतात तोपर्यंत हे लोक इतरत्र आपल्या हाताचा स्पर्श करत असतात.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा असताना कर्मचारी व लोक सर्रास पिचकाऱ्या मारताना दिसत आहेत. आजही सार्वजनिक ठिकाणी घातक माव्याच्या प्लॅस्टिकच्या पुड्या पडलेल्या दिसतात. गुपचूप घातक मावा व महाराष्ट्र बंदी असलेला गुटखा सर्रास शौकीनांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे लोक पिचकाऱ्या मारताना दिसून येत आहेत.लोक स्वतःची काळजी केव्हा घ्यायला शिकणार हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा