गेल्या चोवीस तासांत देशात सापडले ६३,४९० नवे रुग्ण

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२०: देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की देशात संसर्ग झालेल्यांची संख्या २५.८९ लाखांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची ६३,४९० नवीन प्रकरणे आढळली आहेत, तर ९४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाचे ६,७७,४४४ सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत, तर १८,६२,२५८ उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ४९,९८० रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. १८,६२,२५८ रूग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे ही दिलासा देणारी बाब आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) रविवारी सांगितले की, १५ ऑगस्ट रोजी देशभरात कोरोनाच्या ७,४६,६०८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.  आतापर्यंत देशभरात एकूण २,९३,०९,७०३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा