नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२०: कोरोना विषाणूच्या नवीन अकडेवरीनं आतापर्यंतची सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या २४ तासांत जगभरात ३,०७,००० नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली. त्याच वेळी, ५,५३७ लोक मरण पावले आहेत. २४ तासांत नोंदवलेल्या एकूण कोरोना प्रकरणात प्रत्येक तिसरा संक्रमित रुग्ण भारतीय आहे. यापूर्वी, ६ सप्टेंबर २०२० रोजी सर्वात जास्त कोरोनाची प्रकरणे नोंदविली गेली जेव्हा २४ तासांत नवीन कोरोना रूग्णांची संख्या ३,०६,८५७ वर पोहोचली.
तर दुसरीकडे जगभरात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जिथं सर्वात जास्त कोरोना प्रकरणं आढळली आहेत. मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात कोरोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात असून एकूण मृत्यूपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे