नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२० : जगभरात कोरोनाने थैमान घातले असून आत्ता पर्यंत कोट्यावधी लोकांना त्यानी आपल्या विळख्यात घेतले आहे तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. भारतामध्ये कोरोना स्थितीचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोरोना लोकांना वेठीस धरले खरे पण याच कोरोनाने सध्या राजकीय वर्तुळात देखील मोठ्या प्रमाणात हाहा:कार माजवत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून भारतातील विविध राज्यातील अनेक पार्टीच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही नेत्यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली आहे. तर काही नेत्यांनी या विषाणुवर यशस्वी मात देखील केली आहे.
मात्र गेल्या २४ तासामधे भाजपाच्या ५ मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येड्डीरयुप्पा, उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेश अध्यक्ष स्वंतत्र देव सिंह, योगी सरकार मधील मंत्री डाॅ महेंद्र सिंह आणि अाग्राचे भाजप आमदार योंगेद्र उपाध्याय या दिग्गज नेत्यांना गेल्या २४ तासात कोरोना विषाणुची लागण झाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना अहवाल हा पाॅजिटिव्ह येण्या आधीच त्यांनी अनेक बड्या नेत्यांशी बैठक घेतली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी