गोल पोस्ट राष्ट्रीय गेल्या एका महिन्यात झाली २३ लाख पीपीई किटची निर्यात

गेल्या एका महिन्यात झाली २३ लाख पीपीई किटची निर्यात

नवी दिल्ली,१५ ऑगस्ट २०२० : देशातून गेल्या एका महिन्यात २३ लाख पीपीई किटची निर्यात केली असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. अमेरिका, इंग्लंड, युएई, सेनेगल आणि स्लोव्हॅनिया या पाच देशांमध्ये ही निर्यात केली गेली आहे.

देशातल्या पीपीई किटच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारनं या किटच्या निर्यातीला परवानगी दिली होती. सरकारच्या मेक इन इंडिया योजनेनुसार देशात होत असलेलं वैद्यकिय उत्पादनं हे आत्मनिर्भर भारत अभियानाचे यश असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

राज्यांनी आपल्या निधीतून आतापर्यंत १ कोटी ४० लाख पीपीई किटची खरेदी केल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version