राज्यात गेल्या दोन दिवसापासून कोरोना बाबतीत घडत आहे दिलासादायक गोष्टी…..

4

मुंबई, २९ जुलै २०२०: राज्यात गेल्या दोन दिवसापासून रुग्णसंख्या कमी तर कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून, प्रशासनाच्या कार्याला कुठेतरी यश येताना दिसत आहे.

गेल्या २४ राज्यात ७७१७ नवे कोरोना रुग्ण आढळले असून २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात १०,३३३ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याची एकुण कोरोना रुग्णांची संख्या ३,९१,४४० इतकी झाली आहे. तर १,४४,६९४ रुग्णांवर उपचार सुरु आसून २,३२,२७७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा ५९.६४ % इतका झाला आहे. तर एकुण १४,१६५ रुग्ण आत्तापर्यंत या आजाराला बळी पडले आहेत.

राज्यासाठी गेल्या दोन दिवसापासून सकारत्मक आणि दिलासादायक बातम्या जरी येत असल्या तरी अजूनही काही ठिकाणी परिस्थिती ही वाईट आहे. ज्यामुळे नागरिकांनी ऑनलाॅक असले तरी अत्यावश्क गोष्टींसाठी पुर्ण काळजीपुर्वक घराच्या बाहेर पडले पाहिजे आणि आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे या आबीर भावात फिरले नाही पाहीजे. अजूनही काही लोक हे नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा