IPL -14 च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सने पंजाबवर 6 गडी राखून केली मात

अबू धाबी, 29 सप्टेंबर 2021: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामाच्या 42 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स (PBKS) 6 विकेट्सने पराभव केला. अबू धाबीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 135 धावा केल्या. मुंबईने 136 धावांचं लक्ष्य 19 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केलं.

हार्दिक पंड्या 40 आणि किरॉन पोलार्ड 15 धावांवर नाबाद राहिले. दोघांनी 5 व्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. मुंबईकडून सौरभ तिवारीने 45 धावा केल्या. रवी बिष्णोई पंजाबसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 बळी घेतले.

आयपीएल -14 च्या दुसऱ्या टप्प्यातील मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय आहे. या सामन्यापूर्वी त्याला यूएई लेगमध्ये तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मुंबई इंडियंस आता 11 सामन्यात 10 गुण आहेत आणि ती गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.

अशी होती मुंबई इंडियन्सची खेळी

136 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ चांगली सुरुवात करू शकला नाही. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर लेगस्पिनर रवी बिष्णोईने रोहित शर्मा (8) आणि सूर्यकुमार यादव (0) यांना बाद केलं. सौरभ तिवारी आणि क्विंटन डी कॉक (27) यांनी 16 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. शमीने डी कॉकला बोल्ड केलं. दुसरीकडं, सौरभने 37 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 45 धावा केल्या आणि एलिसने त्याला बाद केलं.

खराब क्षेत्ररक्षणामुळं पंजाब किंग्जचे खेळाडू तोट्यात राहिले. 14 व्या षटकात हरप्रीत ब्रारने अर्शदीप सिंगच्या चेंडूवर हार्दिक पंड्याचा झेल सोडला. त्यावेळी तो फक्त 7 धावांवर होता. मुंबईला शेवटच्या 4 षटकांत 40 धावा करायच्या होत्या. शमीने 17 व्या षटकात 11 धावा दिल्या.
हार्दिक पंड्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 18 व्या षटकात 13 धावा दिल्या. पोलार्डने एक षटकार आणि एक चौकार मारला. शेवटच्या 2 षटकांत 16 धावांची गरज होती. शमीने 19 व्या षटकात 17 धावा दिल्या. पंड्याने षटकार ठोकून विजय मिळवला. त्याने षटकात 2 चौकारही मारले. पंड्या 30 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला. 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पोलार्ड 7 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. एक चौकार आणि एक षटकार ठोकले. दोघांनी 23 चेंडूत 45 धावांची नाबाद भागीदारी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा