बिहार मधील आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान, ७८ जागांवर होणार मतदान

बिहार, ७ नोव्हेंबर २०२०: ७ नोव्हेंबरची तारीख बिहारसाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण आज बिहारमधील लोक १५ जिल्ह्यातील ७८ जागांवर मतदानाचा उपयोग करतील. या तिसर्‍या टप्प्यातील लढाईसाठी राजकीय पक्षांनी आधीच जोर दिला होता. या ७८ जागांचं समीकरण काय आहे ते जाणून घेऊया.

आजची सकाळ ही बिहारच्या भविष्याचा पाया घालणारी सकाळ होईल. लोकशाही उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात आज बिहारचे मतदार मतदान करतील. १५ जिल्ह्यांमधील ७८ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये ६३ सर्वसाधारण जागा आहेत तर १३ आरक्षित जागा आहेत. तिसर्‍या टप्प्यात एकूण १२०४ उमेदवार रिंगणात आहेत.

त्याच वेळी २०१५ मध्ये जेडीयूने या ७८ जागांवर २३ जागा जिंकल्या. आरजेडीने ७८ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. भाजपाकडे ७८ जागांवर २० जागा होत्या. त्याचवेळी या ७८ पैकी ११ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. पण, प्रश्न हा आहे की, जेडीयू आरजेडी आणि काँग्रेसने २०१५ च्या निवडणुका सोबत लढवल्या होत्या, यावेळी नितीश यांना आरजेडी आणि काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त चिराग पासवान यांचेही आव्हान उभे आहे, तर नितीश यांच्यासाठी ही निवडणूक २०१५ पेक्षाही अधिक कठीण होणार आहे आणि त्यांच्यासमोर जागा वाचवणे हे एक कठीण आव्हान असेल.

बिहार निवडणुकीतील या तिसऱ्या टप्प्यातील व्हीआयपी चेहऱ्यांचा विचार केला तर अनेक व्हीआयपी चेहरे या तिसऱ्या टप्प्यात आपलं नशीब आजमावतील. सिमरी बख्तियारपूर सीटचे व्हीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश सहनी मैदानात आहेत, त्यांच्यासमोर आरजेडीचे युसुफ सलाउद्दीन आहेत. जेडीयूचे विजेंद्र प्रसाद यादव सुपौल मतदारसंघातील आहेत तर काँग्रेसचे मिनुतुल्ला रहमानी त्यांच्यासमोर आहेत. मोतिहारीमध्ये भाजपचे प्रमोद कुमार रिंगणात आहेत, त्यांच्यासमोर आरजेडीचे ओम प्रकाश चौधरी आहेत. मधेपुरा येथे आरजेडीचे चंद्रशेखर मैदानात आहेत आणि त्यांच्या समोर जन अधिकारी पक्षाचे प्रमुख पप्पू यादव आहेत तर जेडीयूचे निखिल मंडळ येथून निवडणूक लढवत आहेत, ही स्पर्धा त्रिकोणी आहे.

यातील गुन्हेगार नेते

जर या नेत्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची चर्चा केली तर यात ३७१ उमेदवारांविरूद्ध फौजदारी खटले आहेत. ३१ टक्के उमेदवारांचा गुन्हेगारीचा इतिहास आहे, या सर्व गुन्हेगारी उमेदवारांची संपूर्ण कुंडली बिहारमधील लोकांच्या हातात आहे. असं असलं तरी ते निवडून येण्याची शक्यता मात्र कायम आहे. आता या १५ जिल्ह्यातील नागरिकच ठरवतील की कोणाचं भवितव्य काय असंल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा