‘या’ राज्यात पेट्रोल स्वस्त, तर डिझेल झाले महाग; जाणून घ्या इतर राज्यात काय आहे स्थिती

नवी दिल्ली, ८ जानेवारी २०२३ : हिमाचल प्रदेशात डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सुखू सरकारने डिझेलच्या किंमतीवरील व्हॅट वाढवला आहे. हिमाचलमध्ये, सुखू सरकारने डिझेलवरील व्हॅटमध्ये ३ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे आता डिझेलची किंमत ८३.०२ रुपये प्रति लिटरवरून ८६.०५ रुपये प्रति लीटर झाली आहे. तर पेट्रोल ०.५५ रुपयांनी स्वस्त झाले असून, एक लिटर पेट्रोलसाठी ९५.०७ रुपये मोजावे लागत आहेत. तर महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात पेट्रोल स्वस्त झाले आहे. त्याच वेळी, पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल ०.४४ रुपयांनी वाढून १०७.५१ रुपये आणि डिझेल ०.४१ रुपयांनी वाढून ९४.१४ रुपये प्रति लिटर झाले आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले आहे.

  • राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६ .७२ रुपये

दिल्लीत पेट्रोलचा दर ९६ .७२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे आणि चेन्नईत पेट्रोलसाठी १०२.६३ रुपये आणि डिझेलसाठी ९४.२४ रुपये मोजावे लागत आहेत.

  • पुण्यात पेट्रोल १०५ रुपये ८४ पैसे

मुंबई मध्येपेट्रोलचा दर १०६ रुपये ३१ पैसे, तर डिझेलचा दर ९४ रुपये २७ पैसे आहे. तर पुणे शहरात पेट्रोलचा दर १०५ रुपये ८४ पैसे तर डिझेलचा दर ९२ रुपये ३६ पैसे आहे. तर नागपूरमध्ये पेट्रोल १०६ रुपये ०४ पैसे तर डिझेलचा भाव ९२ रुपये ५९ पैसे इतका आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा