मुंबई, १ ऑक्टोंबर २०२०: ३० सप्टेंबर रोजी अनलॉक ४ ची मुदत संपली त्याबरोबरच राज्य सरकारला अनलॉक ५ साठीची आपली नवीन नियमावली जाहीर केली. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या या नवीन निर्देशांमध्ये अनेक गोष्टींना मुभा दिलीय. विशेष म्हणजे २५ मार्च पासून बंद असलेले हॉटेल रेस्टॉरंट यांना पाच ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिलीय. मुंबईबाबत बोलायचं झालं तर अन्नसाखळीतील तिथला महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबईतील डबेवाला. तर डबे वाल्यांसाठी देखील राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेमधून अत्यावश्यक सेवांना आज परवानगी होती मात्र आता डबेवाल्यांना देखील लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीय.
राज्य सरकारनं राज्यातील सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट यांना ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ही हॉटेल्स व रेस्टॉरंट त्यांच्या केवळ पन्नास टक्के क्षमतेनं चालविले जाण्याबाबत निर्बंध ही लावले आहेत. मात्र, यात मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिल्यामुळं डबे वाल्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. मात्र, लोकलमधून प्रवास करण्यासाठी डबेवाल्यांना मुंबई पोलिसांनी दिलेला क्युआर कोड असणं बंधनकारक असणार आहे. तरच एमएमआरमध्ये लोकलमध्ये डबेवाल्यांना प्रवेश मिळणार आहे.
“आम्ही राज्य सरकारचे आभार मानतो. आम्ही सर्व सोशल डिस्टन्सच्या नियमांचं पालन करुन प्रवास करु. डबेवाला आता पुन्हा कामावर रुजू होणार आहे. त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे