उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून धरणाचा बांध फुटला…

चमोली, ७ फेब्रुवरी २०२१: उत्तराखंडच्या चमोली मध्ये तपोवन मध्ये हिम स्खलन झाल्यावर पुराचे पाणी सखल प्रदेशात वेगाने सरकत आहे. याबाबत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गंगेच्या काठी राहणाऱ्या लोकांना नदीजवळ जाऊ नका असे सांगण्यात आले आहे.

प्रशासनाने टिहरी धरणातून पाण्याचा प्रवाह थांबविला असून धरणाचे पाणी शक्य तितके थांबविण्यास सांगितले आहे. रुद्रप्रयागातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क केले जात आहे. थोड्या वेळापूर्वी चमोली जिल्ह्याला पूरचे पाणी पार करून पुढे सरकले आहे.

ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये गंगेच्या काठावर जाऊ नये असा इशारा लोकांना देण्यात आला आहे. हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तेथे लोकांची गर्दी जमली आहे.

उत्तर प्रदेशात अलर्ट
चमोली येथे हिमनग फुटल्यानंतर उन्नाव येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गंगेच्या कडेला असलेल्या सुमारे ३५० खेड्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.उत्तराखंडच्या चमोलीत हिमकडा फुटल्यानंतर कन्नौज जिल्हा प्रशासन सतर्क आहे, गंगेच्या काठावर स्थायिक झालेल्या लोकांना सतर्कतेबाबत डीएमची बैठक बोलावण्यात आली आहे.

फर्रुखाबादमधील गंगा नदीच्या वेगावर अधिकारी लक्ष ठेवून आहेत. गंगा नदीतील पाण्याची पातळी अजूनही सामान्य आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की गंगेपासून धोका होण्याची शक्यता नाही. तरीही आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत.
बिजनौर मध्ये देखील चमोली येथील हीमकडा फुटल्यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगालगतच्या सर्व गावात प्रशासनाने पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात केले असून गंगा केनाऱ्यावरील देवळे, मशिदी व गुरुद्वारातून लाऊडस्पीकर वर माहिती देऊन लोकांना गंगेच्या काठावर जाऊ नका असे सांगितले जात आहे.

गंगेच्या काठी वसलेल्या लोकांना तेथून हलवून सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात येत आहे. बिजनौरचा हा परिसर हरिद्वार सीमेपासून सुरू होऊन गढ़मुक्तेश्वरला जातो. यावेळी गंगेच्या काठावर पडणाऱ्या सर्व गावात सतर्कतेची घोषणा करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा