वाघोली, २२ नोव्हेंबर २०२०: राष्ट्रीय जनहित परिषदेचं उद्घाटन शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आलं व मराठा समाज्यातील रुढी परंपरेच्या नावाखाली होत असलेल्या काही अनिष्ट रुढी परंपरेत बदल घडवण्याचं काम ही संघटना करत आहे.
लग्न कार्यात खर्च टाळून त्या पैशातून त्या नवीन दांपत्यांना व्यावसाय उपलब्ध करून द्या, लग्न वेळेत लावावं, दशक्रिया विधी मध्ये भाषण बाजी थांबणं, तरुण पिढी वाया जात आहे त्याची सुधारणा करणं व शेती न विकता व्यवसाय करणं असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी आमदार अशोक पवार, बाळासाहेब सातव, डाॕ.चंद्रकांत कोलते, कुशबा गावडे, शहाजी आव्हाळे, किशन महाराज जाधव, अलका हरगुडे, सई कोलते पाटील व इतर जेष्ठ नागरिक व स्थानिक लोक उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे