स्वराज्य भवनचा शनिवारी लोकार्पण सोहळा ; पहिले राज्यस्तरीय अधिवेशनही होणार

पुणे, २६ मे २०२३: छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेचे राज्य मध्यवर्ती कार्यालय पुणे शहरात साकारण्यात आले असून, शिवाजीनगर येथे असलेल्या या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस व प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, गणेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा लोकार्पण सोहळा कार्यक्रम शनिवारी २७ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता स्वराज्य भवन, कुबेरा चेंबर्स, शिवाजीनगर येथे होणार आहे. या कार्यालयात पत्रकार परिषद, छोटे मेळावे, शिबिर, बैठका घेण्यासाठी छोटेखानी सभागृह आहे. तसेच स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष दालन असून महिन्यातील ठराविक दिवशी राज्यभरातील जनतेला याठिकाणी संभाजीराजे यांना भेटता येणार आहे.

पदाधिकाऱ्यांचे दालन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कार्यशील राहणार आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर पदयात्रेने बालगंधर्व सभागृह येथे येणार असून तेथे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पहिले अधिवेशन संपन्न होणार आहे. हे अधिवेशन सर्व कार्यकर्त्यांना खुले असल्याचे डॉ. धनंजय जाधव यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा