उजनीच्या डाव्या कालव्यावरील पुलाचे व रस्त्याचे उदघाटन.

माढा, दि. १२ ऑगस्ट २०२० : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरणावरील डाव्या कालव्याच्या सुमारे सव्वीस किलोमीटरचा रस्ता व पुलाच्या कामास सुरुवात झाली आहे. यासाठी सुमारे ७० लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. असे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे उदघाटन लक्ष्मी आनंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश नाना बोबडे यांच्या हस्ते झाले. या कामाचे अंतर २६ किलोमिटर असून या परिसरामध्ये माळेगाव, शेवरे,खुळे वस्ती,कुटे वस्ती,जाधव वस्ती, देशमुख वस्ती,टेंभुर्णी येथील अनेक वाड्या वस्त्यांना याचा फायदा होणार असून या मार्गातील शेती बागायती असून दळणवळणाची वर्दळ खूप मोठी आहे.

बाह्यवळण करून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतर वाढत होते व वेळ पण जात होता यामुळे गेली सहा ते सात वर्षांपूर्वीची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली अशी माहिती ऋषिकेश नाना बोबडे यांनी दिली .

यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करून अडचण सोडवण्यासाठी ७० लाख रुपये या पुलाच्या व रस्त्याच्या कामाला मंजूर करून घेतले या पुलाची लांबी १०२ फूट असून रूंदी २४ फूट आहे येत्या सहा महिन्यात याचे काम पूर्ण होईल असे जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता साबळे यांनी सांगितले. यावेळी उपअभियंता समारिया व परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा