लातूर मधील पहिले किडनी प्रत्यारोपण सेंटर आणि आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

18

लातूर २६ फेब्रुवारी २०२४ : लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा, समाजातील सर्व स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ.प्रमोद प्रभू घुगे यांच्या भव्य-दिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी झाले.

उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते झाले. तर अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी, माजी राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख. तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते श्री.मकरंदजी अनासपुरे व डॉ.सुधीरजी निकम आदींची उपस्थिती होती.

उद्घाटन सोहळ्यास लातूरसह भोवतालच्या बीड-धाराशीव-परभणी जिल्ह्यासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता. वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना-पॅथींच्या बहुसंख्य डॉक्टर मंडळींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉ. प्रमोद घुगे व डॉ.सौ.प्रतिभा प्रमोद घुगे यांनी सर्वांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख