गोल पोस्ट महाराष्ट्र भूगोल प्रदर्शनाचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन

भूगोल प्रदर्शनाचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी,२१ जानेवारी २०२३ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग, भूगोल विभाग व गोगटे-जोगळेकर महाविद्यालय भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भूगोल प्रदर्शनाचे’ ( जिओत्सवाचे) उद्घाटन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला देव घैसास कीर कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय भूगोल विभागप्रमुख डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, भूगोल विभाग प्रमुख सौ.ऋतुजा भोवड, विनायक गावडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

भूगोल विषयक प्रदर्शनात विविध प्रकारचे खडक, संशोधन प्रकल्प, नकाशे, उपग्रहीय प्रतिमा, भौगोलिक उपकरणे, दुर्मिळ नॅशनल जीओग्राफीचे १९६० पासून संग्रहीत केलेले अंक, सर्वेक्षण उपकरणे इ.मांडणी करण्यात आली होती. भूगोल विषयक प्रदर्शनात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व देव, घैसास कीर महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्याचा सहभाग होता. या भूगोल प्रदर्शनाला संस्था पदाधिकारी, भूगोल प्रेमी, शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे २००० जणांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारासमोर सेल्फी पॉईंटही ठेवण्यात आला होता. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिप्ती कदम यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी :जमीर खलफे

error: Content is protected !!
Exit mobile version