चापडगाव येथे रोहित पवार यांच्या हस्ते माझे गाव माझी शाळा उपक्रमाचे उद्घाटन

कर्जत, दि. २ जुलै २०२० : कर्जत तालुक्यातील चापडगाव मध्ये आमदार रोहित पवार यांच्या हस्ते माझे गाव माझी शाळा या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रभाव या मुळे शाळा लवकर सुरु होण्याचे शक्यता कमीच आहे. शाळा उशीराने सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पुर्ण करणे शक्य होणार नाही.

या मुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते हे टाळण्यासाठी आपल्याच गावातील शिकलेल्या आणि संबंधीत विषयांचे ज्ञान असलेल्या मुलांनी १० वी. १२ वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावेत. या साठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून माझे गाव माझी शाळा हा उपक्रम कर्जत जामखेड ईटेलिग्रेड डेव्हल्पमेंट फाउंडेशन आणि वृक्षवल्ली ग्रुप चापडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने चापडगाव येथे हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन दिनांक १ जुलै रोजी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. या उपक्रमात सामील झालेल्या सर्वांनी आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. या वेळी एक टिम तयार केली असुन या मध्ये प्रा.ज्ञानदेव शिंदे,प्रा.वैभव वरतुडे ,गणेश मिसाळ,प्रा.प्रियाका शिंदे, या सह काही मान्यवर या टिम मध्ये आहेत. अशी माहिती वृक्षवली ग्रुपचे अॅड. विकास शिंदे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा