कोरेगाव मुळ, दि. ०५ सप्टेंबर २०२०: कोरेगाव मूळ येथे आज Covid-19 च्या पार्श्वभूमीवर MyGate डिजिटल प्रणालीचा अवलंब उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उरुळी कांचन पोलिस, व औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक पवन चौधरी, कोरेगाव मूळ गावचे पोलिस पाटील, वर्षा कड, सचिन कड उपस्थित होते.
कमिटीचे चेअरमन अमोल गुमल आणि सर्व कमिटी मेंबर्स उपस्थित होते. सोसायटी सभासदांनी अतिशय सुंदर प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विकास गोते, यांनी केले सर्वच उपस्थित पाहुण्यांनी अतिशय मोलाचे आणि अत्यावश्यक मार्गदर्शन केले.
आज पासून ही मायगेट प्रणाली सोसायटीमध्ये अमलात येणार आहे. मायगेट डिजीटल प्रणाली मध्ये covid 19 च्या पार्श्वभूमीवर लोकांवर लक्ष ठेवण्यात मदत होणार आहे. सोसायटी मध्ये परवानगी शिवाय कोणीही येऊ जाऊ शकत नाही. सोसायटी मध्ये कोण आले किती वेळासाठी आले व कोणाच्या घरी आले होते ते समजेल. जर कोणाच्या फ्लॅट मध्ये काही गैर प्रकार किंवा अपघात झाला तर त्याची माहिती लगेच सर्वांना मिळेल, सोसायटीच्या सर्व व्यवहारांची माहिती ऑनलाईन सर्वांना मिळेल. सोसायटी मध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे टेंपरेचर व मास्क आहे की नाही हे पाहिले जाईल, अशा माहिती चेअरमन यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे