फलटण येथे प्रहार जनशक्ती कार्यालयाचे उद्घाटन.

फलटण, सातारा ११ जुलै २०२३ : फलटण येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आ.बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार अपंग क्रांती संघटना या नावाने कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव म्हणाले की, या कार्यालयचा उपयोग गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा, निराधार समाजातील सर्वच घटकांना होईल. तसेच फलटण तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येईल. आपल्याला कुठलीही अडचण आली तर आम्ही आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभेअसल्याची ग्वाही जाधव यांनी दिली.

दरम्यान पुढे प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष सागर गावडे-पाटील म्हणाले, सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून सरकार त्यावर विविध प्रकारचे उपाय करत असले तरी पर्यावरणाची निगा राखली जातेच असे नाही. त्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे गावडे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे माण खटाव विधानसभा प्रमुख अरविंद पिसे, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक मंगेश ढमाळ, जिल्हापाध्यक्ष महेश शिंदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे पाटण तालुकाध्यक्ष शुभम उबाळे, प्रणित भिसे, प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय जिल्हाप्रमुख महेश जगताप, अशोक गोतपागर, राजेंद्र फाळके, महेंद्र गावडे, योगेश हरिहर, संग्राम इंगळे, चंद्रकांत नाळे, सुनील तोडकर, दत्ता पवार, संजय भुजबळ, सिताराम खटके, शिवाजी करचे, जितेंद्र मोहिते, रोहित यादव, शुभम पवार, धनाजी शिंदे, संजय कर्णे, नाना सोनवले आदी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा