नगराध्‍यक्षा पोर्णिमा तावरे यांच्या हस्‍ते तांदूळ महोत्‍सवाचे उद्घाटन

बारामती, ५ फेब्रुवरी २०२१: विकेल ते पिकेल अभियान, संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार शेतकरी ते थेट ग्राहक विक्री अंतर्गत पुरंदर तालुक्‍यातील शेतकरी गटांनी उत्‍पादीत केलेले दर्जेदार इंद्रायणी तांदूळ महोत्‍सवाचे उद्घाटन आज बारामतीच्‍या नगराध्‍यक्षा पोर्णिमा तावरे यांच्या हस्‍ते कृषि भवन प्रशासकीय इमारत येथे करण्‍यात आले.

उद्घाटनानंतर उपस्थित मान्‍यवरांनी सर्व स्‍टॉलला भेट देवून विक्रीसाठी आणलेल्‍या धान्याची माहिती घेतली. सुरुवातीच्या दिवशीच साहित्‍य खरेदीही करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या महोत्‍सवामध्‍ये महालक्ष्‍मी महिला शेतकरी बचत गट, ओमसाई शेतकरी गट, मु.पो.मांढर, भैरवनाथ शेतकरी गट, धनकवडी, जानाई शेतकरी गट, दवणेवाडी ता.पुरंदर, जिवामृत सेंद्रिय शेतकरी बचत गट, सावंतवाडी, महिला बचत गट, पवईमाळ, स्‍वराज्‍य गूळपट्टी, पणदरे, विषमुक्‍त भाजीपाला विक्री केंद्र, विश्‍वासनगर गुणवडी रोड, एकता सेंद्रीय गट मळद, ता.बारामती इत्‍यादी बचत गटांनी या महोत्‍सवामध्‍ये सहभाग घेतला आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती निता बारावकर, गटनेते सचिन सातव, उपसभापती प्रदिप धापटे, डॉ.किर्ती पवार, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषि अधिकारी दत्‍तात्रय पडवळ, तंत्र अधिकारी सुप्रिया बांदल तसेच कृषि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा