‘सरकार आपल्या दारी’ मोबाईल व्हॅनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

6

मुंबई, २१ एप्रिल २०२३: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या या ‘मोबाईल व्हॅनचे’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हा उद्धाटन सोहळा पार पडला.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हेदेखील उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या (सरकार आपल्या दारी) ही मोबाईल व्हॅन ३१ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई महापालिकेच्या सरकार आपल्या दारी हा उपक्रम सुरू असलेल्या वॉर्डमध्ये फिरणार आहे.

या फिरत्या व्हॅन मध्ये एल ई डी स्क्रीन असून या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. आणि महिलांना ही माहिती समजून सांगण्यात येणार आहे. यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलां घेतील.अशी माहिती मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा