आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या विविध प्रकल्पांचं जेजुरी मध्ये उद्घाटन

पुणे, २ जून २०२३: भारतात महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ओळखलं जातं. मात्र अलीकडच्या काळात राज्यातून अनेक मोठे प्रकल्प जाताना दिसले. आता राज्यात पुन्हा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आलीय. पुण्यातील आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् गेल्या काही वर्षांपासून अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहे. याआधी कंपनीने आपले अनेक प्रकल्प जाहीर केले आहेत. आता याच प्रकल्पांचं उद्घाटन १ जुलैला होणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

येत्या १ जुलै २०२३ रोजी या प्रकल्पांचं उद्घाटन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यामध्ये सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, ग्रीन हायड्रोजनची निर्मिती, ह्युमन रोबोट, शून्य अवकाशा (स्पेस डेब्रिज रिमूव्हल), सॅटेलाइट लॉन्चिंग आणि महत्त्वाचं म्हणजे स्पेस संबंधी या दोन्ही प्रोजेक्टसाठी लागणारे वेहिकल म्हणजेच रॉकेटची टेस्ट सुद्धा याच दिवशी होणार आहे. त्याच बरोबर आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या ह्युमन रोबोटचे व्यावसायिक अनावरण करणार आहेत. यावरूनच लक्षात येतं की महाराष्ट्रात आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्‌ कडून किती मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आलीय.

नेमके काय आहेत हे प्रकल्प?

सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग

आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् ने महाराष्ट्रात या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक आणली आहे. यासाठी कंपनी तायवान आणि साऊथ कोरिया या देशांतील कंपन्यांसोबत सुरू असून या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात ओएलइडी डिस्प्ले (OLED) मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणणार आहे. सदर डिस्प्ले अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून अतिशय पातळ असणार आहेत. यासोबतच कंपनी फिंगरप्रिंट सेन्सर बनवणार आहे जे इतर सेंसर च्या तुलनेत अतिशय पातळ असतील. तसेच सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये लागणारे रॉ मटेरियल म्हणजेच सिलिकॉन पावडर देखील कंपनी बनवणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्रात सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग देखील होणार आहे. यामध्ये कंपनी सुरुवातीला पॅकेजिंग आणि टेस्टिंग (OSAT) या क्षेत्रात काम करणार आहे. भविष्यात आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् वेफर मॅन्युफॅक्चरिंग, फोटोलिथोग्राफी या महत्त्वाच्या प्रक्रियेवर देखील काम करणार असून एक आयडीएम कंपनी म्हणून कार्यरत होईल. अप्रत्यक्षरीत्या यातून महाराष्ट्रात लाखोंच्या स्वरूपात रोजगार निर्मिती होणार आहे.

ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन

आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् ग्रीन एनर्जी मध्ये काम करत आहे. आता कंपनी ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन मध्ये देखील उतरत आहे. हायड्रोजन फ्युल हे भविष्य मानलं जाते. हा दूरदृष्टीकोण लक्षात घेऊन कंपनी आता या क्षेत्रात देखील काम करत आहे. यासाठी कंपनीने आपला पायलट प्रोजेक्ट केलेला असून हा पायलट प्रोजेक्ट १ किलो वाॅटचा आहे. हायड्रोजन निर्मिती करत असताना तयार होणारा ऑक्सिजन देखील कंपनी स्टोरेज करून तो रुग्णालयांसाठी, कंपनीचे इतर प्रकल्प जसे की शून्य अवकाशा, सॅटेलाइट लॉन्चिंग यासाठी वापरणार आहे.

शून्य अवकाशा

अवकाशातील कचरा म्हणजेच स्पेस डेब्रिज काढण्याचे काम या प्रकल्पा अंतर्गत होणार आहे. पृथ्वीभोवती फिरणारे सॅटेलाइट जे बंद पडलेले आहेत, रॉकेटच्या वेगवेगळ्या स्टेजेस यांसारखा अवकाशीय कचरा ॲक्टिव्ह सॅटेलाइट्सला धडकून त्या खराब होतात. त्यामुळं अशा अवकाशीय कचऱ्याचा या सॅटेलाइटला धोका असतो. तसेच, भविष्यात स्पेस टुरिझम देखील सुरू होऊ घातलेले असून त्यावर काही कंपन्यांनी काम देखील सुरू केलंय. तर काहींनी यशस्वी चाचणी देखील घेतली आहे. यासर्वांना देखील या स्पेस डेब्रिजचा धोका असतो. त्यामुळं हा अवकाशीय कचरा काढण्याचं काम हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे हेरून आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् आणि युकेतील एका कंपनीसोबत आर्यन्स ग्रुप हे काम साध्य करत आहे. त्याचबरोबर,

सॅटेलाइट लॉन्चिंग

आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् सॅटेलाइट लॉन्चिंगचे देखील काम करणार आहे. टेलीकम्युनिकेशन कंपन्या तसेच इतर प्रायव्हेट कंपन्यांना त्यांच्या प्रकल्पांसाठी अवकाशात सॅटेलाइट्स सोडाव्या लागतात हे आपल्या सर्वांना माहितच असेल आणि भारताची अवकाशीय संस्था इस्रो हे काम करत असतानाच भारत सरकारने सदर कार्यक्षेत्रात भारतात प्रायव्हेट कंपन्यांचा सहभाग वाढावा यासाठी महत्त्वाचे पावले उचलत आहेत. याच संधीचा फायदा घेत आता या आव्हानात्मक क्षेत्रात आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् पदार्पण करणार आहे. १ जुलै रोजी कंपनी स्पेस गरबेज आणि सॅटेलाइट्स लॉन्चिंग करण्यासाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अश्या आपल्या मिनीएचर रॉकेटची टेस्ट घेणार असून सदर रॉकेटच्या निर्मितीमध्ये आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् अमेरिकेतील एका कंपनीचे सहाय्य लाभले आहे.

रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स

कंपनीने ह्यूमोनाईट रोबोट बनवला असून हा रोबोट पूर्णपणे कस्टमाईज आहे. ग्राहक आपल्या आवडीनुसार हा रोबोट कस्टमाईज करून घेऊ शकतात. यासोबतच कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर देखील काम करत आहे.

एकंदरीतच पाहता आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् महाराष्ट्रात आणि भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. याबरोबरच सदर प्रकल्पांमुळे तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील निर्माण होणार आहे. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहे. सदर माहिती देताना ग्रुप चे सीईओ श्री. मनोहर मुकुंद जगताप यांनी त्यांचे जे काही परदेशी व्यवसायिक सहभागीदार आहेत त्यांची माहिती ही गुलदस्त्यात ठेऊन सदर सर्व सहभागीदारांची माहिती ही काही महत्त्वपूर्ण करारनाम्यांच्या अंतर्गत सदर प्रकल्पांच्या शुभारंभाच्या वेळेसच जाहीर केली जाईल असे कळविले आहे.

अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा