मुंबई, ११ऑक्टोबर २०२२: बांद्रा रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली आहे. या ठिकाणी एक जुना स्कायवॉक आहे. त्यांचा काही भाग आज सकाळी आचानक झोपड्यांवर कोसळला आहे. योगायोगाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत प्रशासनाला सुचना देऊनही जीर्ण झालेल्या स्काय वॉकबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे माहिती येथील स्थानिक नागरीकांनी सांगितले. मुंबईतील अनेक ठिकाणी एमएमआरडीएने सातशे कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या स्कायवॉकच्या उपयुक्ततेबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
वांद्रे पूर्व ते कलानगर असा पहिला स्कायवॉक २००८ मध्ये बांधण्यात आला होता. स्थानकांभोवती एकूण ३६ स्कायवॉक बांधण्यात आले आहेत. त्यापैकी २८ स्कायवॉक एमएमआरडीएने तर ८ स्कायवॉक एमएसआरडीसीच्या माध्यमातून बांधले आहेत. स्कायवॉक करण्यासाठी एमएम आरडीएने सुमारे सातशे कोटी रुपये खर्च केला आहे.
एवढेच नाही तर वार्षिक देखभालीसाठी कोट्यवधी रुपये देण्यात येतात. असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर वांद्राच्या स्कायवॉकची जबाबदारी ही आता बीएमसीची असल्याची माहिती समोर आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर












































