गुरु-शिष्यांचं नातं अतूट करणारा पुण्यातील प्रसंग, ओढ्याच्या पुरातून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

मावळ, 13 जुलै 2022: गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरु शिष्याचं नातं अतूट करणारा प्रसंग पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये घडला आहे. गुरुने त्यांच्या शिष्यांना पाण्याचा प्रवाहातून वाट काढून दिली. मानवी साखळी करून सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकाकंडं सुपूर्द केलं.

मावळच्या भडवली येथील छत्रपती शिवाजी विध्याल्याचे हे शिक्षक आणि विध्यार्थी आहेत. गावातील मार्गावर असणाऱ्या ओढ्याला कालच्या पावसाने पुर आला. आजूबाजूच्या शेतातून ही मार्गावर प्रचंड पाणी वाहू लागले. सकाळी शाळेत येत असताना परिस्थिती बारा वाजेपर्यंत बदलली. तेव्हा ओढ्यातून गुडघाभर पाणी वाहू लागलं होतं.

अशा परिस्थितीत ओढ्या पलीकडं जायचं म्हणजे जिवाला धोका पत्करण्यासारखं होतं. विध्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. शेवटी शाळेला सुट्टी देन्यात आली. सर्व शिक्षक सोबतीने आले आणि मग मानवी साखळी करून, ओढ्याच्या पुरातून सुटका करायची ठरलं.

भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी एकमेकांचे हात धरायला सांगितलं. त्यापाण्यातून वाट काढायला सुरुवात केली. हळूहळू या बिकट प्रसंगातून विध्यार्थी बाहेर पडू लागले. अशा प्रकारे पाण्याच्या प्रवाहाचा सामना करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पालकांकडं सुखरूप पोहोचवलं. त्यामुळं पालकांनी ही शिक्षकांचे आभार मानले. योगायोगाने हा प्रसंग गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला घडला. यानिमित्ताने गुरु आणि शिष्यांचं नातं अतूट का असतं हे अधोरेखित झालं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा