गोल पोस्ट महाराष्ट्र शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना, उस्मानाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना, उस्मानाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

उस्मानाबाद, 7 जुलै 2022: शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उस्मानाबादेत घडली. एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थिनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक अमित माळी विरोधात पोलिसांनी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील सावित्रीबाई प्राथमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. कलम 376, (2) (फ) भा द वि.सह. 4, 8, 12 आण बाळ लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडीत मुलगी दहावीची विद्यार्थिनी असून तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसलाय. पीडीत मुलगी दोन महिण्याची गरोदर असल्यानंतर हे भयंकर प्रकरण उघडकीस आले.

विद्यार्थिनी वर नराधम शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. ही मुलगी एके दिवशी गाडीवरून प्रवास करताना अचानक रक्तस्त्रावाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिला जवळच्या रूग्णालयात दाखल केले असता तपासणी करण्यात आली तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याची बातमी समोर आली. तेव्हा या प्रकरणी खुलासा झाला. अखेर मुलीनेच या शिक्षकाविरोधात जबाब नोंदवला. या शिक्षकाला दोन दिवसांची पोलिस कोठडीदेखील सुनावण्यात आलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version