औरंगाबाद, १६ डिसेंबर २०२०: तुम्ही नेहमी महिलांवंरील अत्याचाराच्या बातम्या किंवा तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं वाचलं ऐकलं असेल. मात्र, लाॅकडाऊन मधे याच्या उलट घटना घडल्याचं समोर आलं आहे. लाॅकडाऊन मधे पुरूषांचा छळ अधिक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अगदी पोलीस ठाण्यात दाद मागण्याची वेळ या बिच्चाऱ्या पुरुषांवर आली आहे. एक दोन नव्हे, औरंगाबादमधल्या तब्बल २०० हून अधिक नवरोबांनी आपल्या पत्नीविरुद्ध तक्रारी केल्या आहेत.
भरोसा तक्रार सेल हे पिडित महिलांसाठी आणि मुलांच्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी सुरू करण्यात आले होते. मात्र आता इथे महिला सोडून बायकांच्या त्रासाला कंटाळलेल्या नवऱ्यांच्या तक्रारीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
नवऱ्याची व्यथा …
सासू-सासरे बायकोला नांदायला पाठवतच नाहीत.
सासरची मंडळी माझा छळ करतात
माझी बायको माझा छळ करते
मोबाईलच्या नादात संसाराकडं दुर्लक्ष होतंय
माझी बायको मला समजून घेत नाही
आईवडिलांसोबत राहायला नकार देते
यातल्या काही तक्रारी सोडवण्यात पोलिसांना यश आलं. काही प्रकरणात मात्र परिस्थिती घटस्फोटा पर्यंत पोहोचलीय. त्यामुळं पोलिसांना देखील मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. तर भरोसा सेल पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी सांगितलं की, नवऱ्यांच्या तक्रारीत वाढ होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव