अमेरिकेत पुन्हा फायरींगची घटना, संगीत कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, पोलिसांसह अनेक जण जखमी

यूएस, 20 जून 2022: गोळीबाराच्या घटनेने अमेरिका पुन्हा हादरली आहे. यावेळी वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर गोळीबार झाला. यामध्ये एका पोलिसासह अनेक जण जखमी झाले. नंतर, या जखमींपैकी एका 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

एका संगीत कार्यक्रमादरम्यान गोळीबाराची घटना घडली. ही मैफल जूनटीनच्या सेलिब्रेशनसाठी होत होती. 14 आणि यू स्ट्रीट भागात गोळीबाराची घटना घडली.

पोलिस कर्मचाऱ्यासह एकूण चार जणांना गोळ्या लागल्या. परिसरात गर्दी होती, त्यामुळे पोलिसांनी तेथे गोळीबार केला नाही. जखमींमध्ये एका 15 वर्षीय मुलाचाही समावेश असून, त्याचा मृत्यू झाला.

अमेरिकेत अशा गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. लहान मुले आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी अशा शस्त्रांवर बंदी घातली पाहिजे, असे ते म्हणाले होते. बायडेन येत्या काही दिवसांत बंदूक खरेदीचे वय 18 वरून 21 वर्षांपर्यंत वाढवू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा