मध्य प्रदेशमधे माणुसकीला काळीमा फसणारी घटना…

गुनाम (मध्य प्रदेश), दि. १७ जुलै २०२०: मध्य प्रदेशातल्या गुनामध्ये पोलिसांनी एका शेतकरी दलित जोडप्याला अमानुष मारहाण केली. या जोडप्याची शेती ज्या जमिनीवर होती ती सरकारी जमीन होती आणि त्यांना इथून हटवण्यासाठी मारहाण करण्यात आल्यानंतर या जोडप्याने विष घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या जोडप्यातल्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकारात जेव्हा दाम्पत्य हे तिथेच विष घेत होते तेव्हा त्यांची ७ मुलं त्यांना आडवत होती रडत किंचाळत होती. या प्रकारत ही प्रशासन आणि पोलिसांना त्यांची दया आली नाही. तर मुले हे जोडप्याला रडत उठवत असल्याचे व्हायरल व्हिडिओ मधे दिसत आहे.

या नंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंंह चौहान यांनी पोलिसांना बडतर्फ केले आहे. यामुळे शिवराज सरकावर विरोधकांकडून टिकेची झोड उठली आहे. तर त्यांचा राजनाम्याची मागणी देखील केली जात आहे.

या कुटुंबांचा हा व्हिडीओ हा हा म्हणता सोशल मिडिया मधे व्हायरल झाला आणि समाज माध्यमातून लोकांनी प्रशासन व पोलिसांच्या या वागणूकीवर अक्रोश करत आपला निषेध नोंदविला आहे. अनेक राजकीय नेत्यानीं ट्विटर वर आपली प्रतिक्रीया नोंदवत निषेध व्यक्त करत शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारला धारेवर धरले आहे.

काही गोष्टी या अनधिकृत असल्या तरी कायद्याने त्यावर कार्यवाही होऊ शकते. मात्र तसे न होता मध्य प्रदेशामधील दलित कुंटूबाला अमानुष मारहाणीची घटना ही कायद्याचे धिंदवडे उडवत माणुसकीला काळीमा फासणारी होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा