नवी दिल्ली, ३ जुलै २०२१: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेली १२ शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (एसएसबीएस) -१० मीटरची पहिली खेप काल २ जुलै २०२१ रोजी करिअप्पा परेड मैदान, दिल्ली कॅन्ट.येथे झालेल्या एका समारंभात लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी भारतीय सैन्यात दाखल करून घेतली. संरक्षण व विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यावेळी उपस्थित होते.
एसएसबीएस -१० मीटर लांबीचा पूल ९.५ मीटर अंतराची दरी साधण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावेल . यामुळे ४ मीटर रुंदीचा, संपूर्ण सुशोभित रस्ता तयार होऊन सैन्याच्या वेगवान हालचाली सुनिश्चित होतील. संशोधन व विकास आस्थापना (इंजि. ) पुणे या डीआरडीओच्या अग्रणी अभियांत्रिकी प्रयोगशाळेने मेसर्स एल अँड टी लि. च्या सहकार्याने या प्रणालीची रचना व विकास केला आहे. हे १२ पूल मेसर्स एल अँड टी लिमिटेडच्या १०२ SSBS-१० मी. चा भाग आहेत. एल अँड टी याचे उत्पादन करत आहे.
शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम प्रकल्पात तात्रा ६x६ चेसिसवरील ५ मीटर एसएसबीएसच्या दोन प्रोटोटाइप आणि तात्रा ८x८ री-इंजीनियर चेसिसवरील १० मीटर एसएसबीएसच्या आणखी दोन प्रोटोटाइपचा विकास समाविष्ट आहे. दोन्ही प्रणालींचे गुणवत्ता हमी महासंचालनालय (डीजीक्यूए), एमईटी आणि यूजर चाचण्या घेण्यात आल्या आणि या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर या प्रणाली सेवांमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली. ही ब्रिजिंग सिस्टम सर्वत्र ब्रिजिंग सिस्टमशी ( ७५ मी) सुसंगत आहे, ज्यात शेवटच्या टप्प्यात ९.५ मीटरपेक्षा कमी अंतर सांधण्याची आवश्यकता असते. तैनात केलेला पूल एमएलसी ७० भार वर्गीकरणातला आहे. या प्रणालीमुळे सैन्याला वेगवान हालचाली करण्यात आणि संसाधने जुळवण्यात मदत होईल.
डीआरडीओकडे मिलिटरी ब्रिजिंग सिस्टमसारख्या महत्वाच्या लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली विकसित करण्याचा गाढा अनुभव आहे. सिंगल स्पॅन ५ m आणि १०m , शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम,४६m मॉड्यूलर ब्रिज, २० m BLT-T72 आणि मल्टी स्पॅन ७५ मीटर सर्वत्र ब्रिजिंग सिस्टम आदी प्रणाली भारतीय सैन्यासाठी विकसित केल्या आहेत. यापूर्वी डीआरडीओने मॅन्युअली लॉन्च ३४.५ मीटर माउंटन फूट ब्रिजदेखील विकसित केला होता. या पुलांना भारतीय सैन्याने मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे.
या प्रणालीचा यशस्वीपणे विकास आणि लष्करात समावेश झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सैन्य व उद्योग क्षेत्र यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, यामुळे वेगाने वाढणार्या भारतीय संरक्षण औद्योगिक परिसंस्थेला चालना मिळेल आणि उद्योगांना ‘आत्मनिर्भर भारत’ साठी योगदान देण्यात मदत होईल. या ब्रिजिंग सिस्टमचा यशस्वी विकास आणि भारतीय लष्करात समावेश झाल्याबद्दल डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी या सम्पूर्ण प्रक्रियेत सहभागी झालेल्या चमूंचे अभिनंदन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे