पुणे, १५ सप्टेंबर २०२२: मागील पाच वर्षांपासून पुणे विभागात होणाऱ्या पर्जन्यवृष्टी आणि व्यवस्थापनाच्या मदतीने काही शहरांची निवड केली. यात देशातील सात शहरे निवडून आले असून, त्यात पुणे शहराचे नाव आहे.
पुणे महापालिका (पीएमसी) व पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बरसणाऱ्या पावसामुळे पुण्यात पुरासारख्या स्थितीला पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. अशातच शहर पुर नियंत्रण व्यवस्थापन शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश करण्यात आला असून यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने या योजनेसाठी आम्हाला ५० कोटीचा निधी मंजूर केला आहे. हा निधी आगामी पाच वर्षाच्या पूर नियंत्रणाच्या स्थितीसाठी असून, २०२६ पर्यंत आमच्याकडे असणार आहे. यासंबंधीच्या सूचना व आदेश याच आठवड्यात आले असून महापालिका प्रशासन कामालाही लागले आहे. यासंदर्भात माहिती देताना पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आयुक्त सचिन इथापे यांनी सांगितले.
मागच्या रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नागपूर, बंगळुरू, मुंबई, नवी मुंबई सह अनेक ठिकाणी धोक्याची स्थिती निर्माण झाली होती. याशिवाय शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा नदी पात्रालगतच्या वसाहतीत पूर येतो. देशातील अशा मोठ्या शहरात पुराचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मागील काही वर्षांपासून वरूनराजा पुणे विभागावर अधिकच मेहरबान होत असून, जास्तीच्या पावसामुळे पुणेकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड