पाऊन एकर क्षेत्रात भोपळा लागवडीतून सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न…

इंदापूर, ३० ऑगस्ट २०२०: इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील शेतकय्रांने पाऊण एकर क्षेत्रात भोपळ्याची लागवड केली आहे. कमी खर्चात , रोगराई कमी आणी उत्पन्न जास्त यामुळे या करोणा संसर्गजन्य काळात आत्तापर्यंत १ लाख २५ हजाराचे उत्पन्न या शेतकय्राला भोपळ्यातुन मिळाले आहे.

येथील दिपक लक्ष्मण रणवरे यांचे क्षेत्र निरवांगी – निमसाखर या शिवेलागुन निमसाखर हद्दीत आहे. ऊस पीकांसह अन्य पारंपारीक पीके घेत असतो.शेतामध्ये भोपळा लागवड करण्यासाठी मित्रांनी सल्ला दिला. या प्रमाणे १ जुलै रोजी भोपळाची लागवड केली. या बागेसाठी शेताची योग्य ती मशागत करुन जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला गेला.

भोपळा या पिकाचे जादा उत्पन्न देणारे वाण कोणते याची चौकशी इतरत्र केल्यानंतर वरद वाणाला प्राधान्य दिले.यासाठी दोन वेलींमध्ये २ फुट तर दोन ओळींमधील ६ फुट अंतर ठेवण्यात आले आहे.दोन महिण्याच्या या बागेत बुरशी आणी करपा मध्यंतरीच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव झाला पण योग्य वेळी बागेवर रासायनिक फवारणी केल्याने रोगाचा फार फैलाव झाला नाही.रोज सर्वसाधारण पाचशे किलोच्या आसपास दररोज भोपळा व्यापाय्रांच्या माध्यमातुन पुण्याच्या बाजारपेठेत पाठवला जात आहे. या बारपेठेत कमीत कमी २० रु तर जास्तीत जास्त २७ रुपये दर मिळाला असुन आत्ता पर्यंत एक लाख २५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.

दरम्यान या भोपळ्याचे एकुण ४ हजार ८०० किलो वजन भरले आहे.याच बरोबर असुन तीन महिणे याचे बागेतुन उत्पादन मिळतच राहणार आहे. या बागेसाठी फार गुंतवणुक करावी लागली नसल्याचे यावेळी दिपक रणवरे यांनी सांगितले. पुढे बोलताना रणवरे म्हणाले कि ,भोपळ्याला प्लाटिक आवरण घालणे ,बाग ते घर वाहतुक, वजन करणे यासाठी पत्नी , मुले यांची मोठी साथ मिळाली. दरम्यान थोडा फार मजुरावरती या कामासाठी खर्च होतो मात्र बागेतुन चांगले उत्पन्न मिळत असल्याने परवडत असल्याचे रणवरे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा