मुंबई, ४ मार्च २०२१: प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. फँटम फिल्म, क्वान, एक्साइड, रिलायन्स एंटरटेनमेंट या चार कंपन्यांवर आयकर कडून छापे घालण्यात आले आहेत. यापूर्वी बुधवारी प्राप्तिकर विभागाने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तपशी पन्नू यांच्या घरी छापा टाकला. बॉलिवूडच्या दोन्ही स्टार्सची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बराच काळ विचारपूस केली होती.
प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, कर चुकवल्याप्रकरणी फॅन्टम चित्रपटातील लोकांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आदींचा समावेश आहे. फॅंटम चित्रपटांद्वारे कर चुकवण्याच्या संदर्भात इतर बर्याच जणांचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई व पुण्यात सुमारे २० ते २२ ठिकाणी अनुराग कश्यप, तापसी पन्नू, मधु मन्तेना, विकास बहल आणि फॅंटम फिल्म्ससह इतर तीन कार्यालयांचा शोध घेतला होता.
फॅंटम फिल्म्सची स्थापना २०११ मध्ये अनुराग कश्यप, मधु मन्तेना, विक्रमादित्य मोटवणे आणि विकास बहल यांनी केली होती. तथापि, ऑक्टोबर २०१८ मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे