जालन्यात इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांची छापेमारी, शेकडो कोटींची मालमत्ता ताब्यात

जालना, ११ ऑगस्ट २०२२: जालन्यात इनकम टॅक्स विभागाने सलग आठ दिवस केलेल्या छापेमारीत ५६ कोटी रोख रक्कम, ३२ किलो सोनं इतर कागदपत्रांसह ३९० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर घबाड सापडल्यामुळं ही छापेमारी राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

औरंगाबाद इन्कमटॅक्स विभागाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. जालना येथील एका स्टील व्यवसायिकाने घबाड लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापेमारीचं पूर्व नियोजन करून ही छापीमारी करण्यात आली. यामध्ये तीनशे अधिकारी कामाला लावण्यात आले. यामध्ये दोनशे पन्नास अधिकाऱ्यांना नाशिकहुन जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार एकशेवीस गाड्यांमधून एक ऑगस्टला जालन्यात छापेमारी केली. यावेळी या अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर लग्नाचे स्टिकर लावून वऱ्हाडाच्या वेशात अधिकारी आले होते.

तपासणी करताना अधिकाऱ्यांना आपलं कार्यकौशल्य वापरून छापेमारीमध्ये स्टील व्यावसायिकाच्या कपाटात व कपाटाखाली देखील रोख रक्कम मिळाली. चक्क बीछान्यामध्ये रोख रक्कम लपवली होती. केवळ कपाट आणि बीछानाच नाही तर अडगळीच्या ठिकाणी ठेवलेल्या पिशव्यांमधुन रोख रक्कम सापडली.

आठ दिवस चाललेल्या या छापेमारी मध्येस्टील व्यवसायिकाने जमवून ठेवलेली काळी माया इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी हस्तगत केलीय. एक ऑगस्ट पासून सुरू झालेली तपासणी आठ ऑगस्ट पर्यंत सुरू होती. या कारवाई नंतर आता स्टील व्यावसाईकास अटक करून पुढील चौकशीची कारवाई करण्यात येणार आहे. पुढील तपासातूनही काही नवीन खुलासा होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा