पुणे विमानतळावर अपुऱ्या सुविधांमुळे प्रवासांची गैरसोय

पुणे, २४ डिसेंबर २०२२: पुणे विमानतळावरून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. त्यामुळेच पुणे विमानतळावर वाढणारी गर्दी आणि असुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी संख्येचा विचार करता पुणे विमानतळ आता लहान पडत आहे. यासोबतच विमानतळाजवळ होणारी वाहतूक कोंडी, विमानतळावर पोहोचल्यावर अन्य सोपस्कार पार पाडण्यासाठी लांबच्या लांब असणार्‍या रांगा यासारख्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी पुण्यापेक्षा मुंबई येथून जाण्यास पसंती देत आहेत.

विंटर शेड्युलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढणार याचा विमानतळ प्रशासनाला अंदाज होता. तेव्हा आधीपासूनच गर्दीचे नियोजन होणे गरजेचे होते. प्रवाशांना असुविधेला तोंड द्यावे लागणे ही निषेधार्थ बाब आहे. विमानतळ प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी असे हवाई वाहतूक तज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले. त्याचप्रमाणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी गर्दीचे नियोजन सुरू असून चेकिंग सर्वर मध्ये बिघाड झालेला परंतू थेट प्रवासाची तपासणी केली गेली अशी माहिती दिली.

प्रवाशांच्या समस्या पुढील प्रमाणे
•दोन तास अगोदर येऊनही रांगेत उभे राहावे लागते
•रिसिड्युल झालेल्या प्रवासांना थांबण्यासाठी विशेष सोय केली गेली नाही
•जा प्रवाशांचे कनेक्टिंग विमान असते त्यांना विश्रांतीसाठी शॉर्ट ओव्हरची सुविधा नाही
•स्टीलच्या बाकड्यांवर बसून विमानाची प्रतीक्षा करावी लागते
•विमानतळावर रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

प्रवेशापासून ते सिक्युरिटी चेक इन पर्यंत प्रवाशांना रांगांमध्ये थांबावे लागते. टर्मिनलच्या क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवासी पुणे विमानतळावरून प्रवास करतात. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया होऊन विमानात बसेपर्यंत दीड ते दोन तास लागतात. एवढेच नाही तर जागा कमी पडत असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या नाहीत. त्यांना स्टीलच्या बाकड्यांवरच बसावे लागते. पर्याप्त विश्रांती कक्षाचा अभाव, बागेच बेल्ट कमी आणि पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांची गैरसोय अशा समस्यांना पुणे विमानतळाला सामोरे जावे लागत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा