नवी दिल्ली, २६ ऑगस्ट २०२०: व्यापक चाचण्यांच्या माध्यमातून वेळीच कोविड-१९ संक्रमणाचे निदान याची भारतातील संक्रमणाविरोधातील रणनितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र सरकारच्या ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ धोरणानूसार राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे देशात दररोज १० लाख चाचण्यांची क्षमता निर्माण झाली आहे.
गेल्या ७ दिवसांतील चाचण्यांची संख्या ही केंद्र आणि राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेशांचे या दिशेने असलेले निर्धारित, केंद्रित, सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्न दर्शवते. आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांची संख्या ३,७६,५१,५१२ एवढी आहे. तर, गेल्या २४ तासांत ८,२३,९९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. सातत्यपूर्ण चाचण्यांमुळे लवकर निदान होते. लवकर निदान झाल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांचे अलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल करण्याची संधी मिळते. यामुळे मृत्यूदर कमी होत आहे.
विस्तारित प्रयोगशाळा नेटवर्क आणि देशभरात सुलभ चाचणीसाठीच्या सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. यामुळेच प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण (TPM) वाढून २७,२८४ एवढे झाले आहे. यात सातत्याने वृद्धी होत आहे.
भारतातील चाचणी प्रयोगशाळांचे जाळे सातत्याने विस्तारत आहे, सध्या १,५४० प्रयोगशाळा आहेत. ९९२ प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि ५४८ प्रयोगशाळा खासगी क्षेत्रात आहेत. यामध्ये
• रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा ७९० : (शासकीय : ४६० + खासगी : ३३०)
• ट्रू नॅट आधारित चाचणी चाचणी प्रयोगशाळा ६३२ : (शासकीय : ४९८ + खासगी १३४)
सीबीएनएएटी आधारित प्रयोगशाळा : ११८ (शासकीय : ३४ + खासगी : ८४)
न्यूज अनकट प्रतिनिधी