या आठवड्यात कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये मोठी वाढ

3
नवी दिल्ली, २२ फेब्रुवरी २०२१: काल रविवारी भारतात कोरोनाव्हायरस ची एकूण प्रकरणे ११ मिल्लियन म्हणजेच १.१ करोड च्या पार गेली. मात्र, शेवटचे एक मिलियन कोरोनाव्हायरस ची प्रकरणे ६५ दिवसांमध्ये आली आहेत. जो आत्तापर्यंतचा सर्वात दिलासादायक आकडा आहे. असे असले तरी गेल्या आठवड्याभरात कोरोनाव्हायरस च्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरस चे एकूण १४ हजार १९९ प्रकरणे समोर आली आहेत. यासह देशातील एकूण पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या १,१०,०५,८५० एवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासात झालेल्या ८३ मृत्यूनंतर कोरोनाव्हायरस मुळे मृत्यू पावलेल्या एकूण लोकांची संख्या १,५६,३८५ वर पोचली आहे.
आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत एकूण १,११,१६,८५४ लोकांना लस देण्यात आली आहे. सध्या स्थितीला भारतात एकूण ॲक्टिव्ह प्रकरणांची संख्या १,५०,०५५ तर बरे  होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या १,०६,९९,४१० झाली आहे.
राज्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाव्हायरस ची प्रकरणे निदर्शनास आले. या आठवड्यात ८१% एवढी मोठी वाढ प्रकरणांमध्ये दिसून आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे लॉक डाउन देखील लावण्यात आले. नुकतीच उद्धव ठाकरेंनी याबाबत परत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि याबाबत सूचना संबंधितांना दिल्या. लॉक डाऊन करण्याचा कोणताही हेतू सरकारचा नाही असे स्पष्ट करत त्यांनी  नागरिकांना सर्व निर्बंध पाळण्याचे कडक निर्देश दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा