नीरा नदी पाणी पातळीत वाढ; शेतकरी सुखावला

इंदापूर, दि. १० सप्टेंबर २०२०:निमसाखर (ता.इंदापूर) येथील सध्या धरण परिसरात होत असलेल्या पर्जन्य वृष्टीमुळे नीरा नदीवरील पाणी पातळीत वाढ झाल्याने निरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विर्सग करण्यात येत असल्याने तसेच निमसाखर व निरा परिसरात सतत संततधार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

सध्या होत असलेल्या पाऊसामुळे निरा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. तर सततच्या संतधार पाऊसामुळे गवताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सद्य परिस्थितीत सुटला असल्याचे दिसून येत आहे. निमसाखर येथील गावरान क्षेत्रात गवत वाढले असल्याने हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सध्या तरी मार्गी लागला असल्याने पशूपालकांनमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे शेतातही मोठ्या प्रमाणात गाजर गवतासह अन्य प्रकारचे गवतही अधिक वाढल्याने शेतकरी वर्गात काहीसे चिंतेचे वातावरण असुन शेतातील अशा गवतावरती तणनाशक औषधांची फवारणी करण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढु लागला आहे. यामुळे सध्या सतत होणाऱ्या पाऊसामुळे ‘कभी खुशी कभी गम’ अशीच काहीशी परीस्थिती निर्माण झाली आहे.

”सध्या होत असलेल्या पाऊसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सध्या तरी मार्गी लागला आहे मात्र शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवतासह अन्य प्रकारचे गवत हि अधिक वाढल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे.” – धनंजय रमेश चव्हाण (युवा शेतकरी निमसाखर)

न्यूज अनकट प्रतिनिधी- निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा