नाशिक, २० नोव्हेंबर २०२० : दिवाळीच्या सुट्टीनंतर ७ दिवसांनी उघडलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारसमित्यांमध्ये काल काद्यांला चांगला भाव मिळाला. गेल्या आठवड्यात ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दरानं विकल्या गेलेल्या कांद्याला काल सरासरी ४ हजार रुपये भाव मिळाला.
कमी आवक असलेल्या नव्या लाल कांद्याला ४ हजार १०० रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात क्विंटलला ४०० रुपये तर लाल कांद्याच्या दरात हजार रुपयांची वाढ झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी