बारामती,२६ सप्टेंबर २०२० :उंडवडी येथील सुमारे ३७ लाख रुपयांच्या गांजाची वाहतूक करत असताना केलेल्या कारवाईतील चार आरोपींना न्यायाधीशांनी १ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना पकडले असुन दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
बारामती तालुका पोलिसांनी पाटस-बारामती रस्त्यावर उंडवडी येथील ड्रायव्हर ढाब्याजवळ ही कारवाई केली होती.या प्रकरणी एकूण सहाजणांविरोधात एन.डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये विजय जालिंदर कणसे (वय 26, रा. कानरवाडी, ता. कडेगाव, जि. सांगली), विशाल मनोहर राठोड (वय 19, रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली), नीलेश तानाजी चव्हाण (वय 32, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा), योगेश शिवाजी भगत (वय 22, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती), दिपक उर्फ विनोद खालकर (रा. संगमनेर, जि. अ. नगर), सागर थोरात (रा. सोनगाव, ता. बारामती) यांचा समावेश आहे. यातील खालकर व थोरात अद्याप फरार आहेत.तर चौघांना कारवाई वेळीच अटक करण्यात आली होती.चार आरोपींची कोठडी २५ तारखेला संपल्यावर न्यायालयाने त्यांना १ आॅक्टोबरपर्यंत कोठडी वाढवून दिली आहे.
या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे ४७ लाखांच्या गांजासह १० लाखांचा टेम्पो असा ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. आरोपींनी गांजा आंध्रप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.