भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ; प्रशासनाची चिंता वाढवणारी आकडेवारी

नवी दिल्ली, १८ जुलै २०२२: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील ७ आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांच्यां आकडेवारी होणारी वाढ चिंताजनक आहे. एका आठवड्यात सव्वा लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

तर ३०० हून जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाबत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बूस्टर डोस जास्तीत जास्त लोकानी घ्यावा यासाठी अभियान सूरु करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत कोरोनाचे १६ हजार ९३५ रुग्ण समोर आले आहेत.

तर ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे १६१ दिवसांनंतर पुन्हा कोरोना संक्रमितांचा दर ६
टक्कयाहून अधिक झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच प्रमाण मानलं तर ज्याठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्याहून अधिक असेल तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ पाहता प्रशासन सतर्क झाले आहे.

सध्या देशात १.४४ लाख सक्रीय रुग्ण आहेत. त्यात २४ तासांत ८१५ रुग्णांची भर पडली आहे. आकडेवारी पाहिली तर ६ टक्क्यांहून अधिक रुगणसंख्येत वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडा ३२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. २४ तासांत पच्छिम बंगालमध्ये २ हजार ६५९, केरळ २६०४, तमिलनाडु २३१६, महाराष्ट्र २१८६, आणि कर्नाटकात ९४४, रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत ४९८ तर युपीत ३५९ रुग्ण सापडले आहेत.

कोरोना संक्रमण वाढण्यामागे ओमायक्रॉन सब व्हेरिएंट कारणीभूत आहे. महाराष्ट्रात ८० ते ८५ टक्के रुग्ण BA2, BA2.38 व्हेरिएंटचे आहेत. परंतू सब व्हेरिएंट जास्त गंभीर नाही, त्यामुळे लोकांनी जास्त घाबरु नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा