IND vs SA, अश्विनने वांडरर्स मध्ये रचला इतिहास, कुंबळेनंतर असं करणारा पहिला भारतीय

वांडरर्स, 6 जानेवारी 2022: जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (5 जानेवारी) भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने इतिहास रचला. माजी दिग्गज अनिल कुंबळेनंतर ही कामगिरी करणारा अश्विन हा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे.

वास्तविक, जोहान्सबर्गच्या मैदानावर भारताकडून फक्त अनिल कुंबळे हा एकमेव फिरकीपटू होता, जो आतापर्यंत विकेट घेऊ शकला आहे. त्याने येथे एकूण 17 विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय या मैदानावर भारताचा कोणताही फिरकीपटू विकेट घेऊ शकला नाही, मात्र आता अश्विनने ही कामगिरी केली आहे.

अश्विनने पीटरसनला बळी बनवले

जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात अश्विनने कीगन पीटरसनला LBW बाद केलं. यासह कुंबळेनंतर या मैदानावर विकेट घेणारा तो पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. या मैदानावर रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर यांनीही भारतासाठी गोलंदाजी केली आहे. अश्विनच्या आधी, एकूणच येथे पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज शादाब खानने जानेवारी 2019 मध्ये एक विकेट घेतली होती.

अश्विनने निर्णायक क्षणी विकेट घेतली

अश्विनने अत्यंत महत्त्वाच्या वेळी ही विकेट घेतली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने एका विकेटच्या मोबदल्यात 93 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार डीन एल्गर आणि पीटरसन मोठ्या भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत होते, मात्र अश्विनने ते रोखले.

त्याने पीटरसनला शिकार बनवून ही भागीदारी तोडली. तो बाद झाला तोपर्यंत पीटरसनने एल्गरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली होती.

भारतीय संघ तीन कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना 113 धावांनी जिंकला होता. जोहान्सबर्ग येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जिंकला तर प्रथमच दक्षिण आफ्रिकेत द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा