Ind Vs Sa, ODI Team: दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची केली घोषणा

मुंबई, 3 जानेवारी 2022: दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाविरुद्धच्या होम वनडे मालिकेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने टेंबा बावुमाकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनची वनडे संघात प्रथमच निवड झाली. त्याला पदार्पणाची संधी मिळणार आहे.

याशिवाय वेन पारनेल, सिसांडा मगाला आणि झुबेर हमजा यांचे संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेला ही एकदिवसीय मालिका भारतीय संघाविरुद्ध 19 जानेवारीपासून खेळायची आहे. यानंतर दुसरी वनडे 21 रोजी आणि तिसरा सामना 23 जानेवारी रोजी खेळवला जाईल. त्याचबरोबर या मालिकेसाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

कसोटीतून निवृत्तीनंतर डी कॉकची पहिली एकदिवसीय मालिका

यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकचाही संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर त्याने तत्काळ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. डेकॉक यांनी 30 डिसेंबर 2021 रोजीच ही सेवानिवृत्ती जाहीर केली. कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर ही त्याची पहिली एकदिवसीय मालिका असेल. 29 वर्षीय डेकॉकने सांगितले होते की, त्याला आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, झुबीन हमझा, मार्को जेन्सेन, जानेमन मालन, सिसांडा मगाला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, एंडिले फेहलुवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रैबाडा , रसी वेन डेर दुसेन आणि काइले वेरेयने.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा