गोल पोस्ट महाराष्ट्र इंदापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी पुष्पा रेडके

इंदापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी पुष्पा रेडके

इंदापूर : इंदापूर पंचायत समिती सभापतीपदी कोण विराजमान होणार याची गेले कित्येक दिवस तालुक्यात गावागावांत चर्चा रंगली होती. अखेर आज झालेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील गटाच्या सदस्या पुष्पा अविनाश रेडके यांची सभापतीपदी तर उपसभापती पदी संजय देहाडे यांची निवड झाली.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी कॉग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र सदस्यांपैकी कोणीही भाजपात प्रवेश केला नाही. त्यामुळे इंदापूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचा मात्र काँग्रेस पक्षाचा सभापती, उपसभापती विराजमान झाल्यामुळे इंदापूर पंचायत समितीवर हर्षवर्धन पाटील यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version