इंदापूर शहरातील काँग्रेस भवनचा वाद चिघळला

इंदापूर : इंदापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस भवनचा वाद आता चिघळला आहे. सन १९७६ साली पुणे जिल्हाधिकारी यांनी अध्यक्ष इंदापूर काँग्रेस कमिटी या नावाने सदर जागा दिली होती.
त्यानंतर या ठिकाणी दुमजली इमारत बांधण्यात आली. मात्र माजी1मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इंदापूरच्या स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या इमारतीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑक्टोबर मध्ये या इमारतीला टाळे ठोकण्यात आले.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपलब्ध कागदपत्रांनुसार असे आढळून येते की, सण एप्रिल २०१९ मध्ये काँग्रेस कमिटीचे नाव बदलून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्ट अशी नव्याने धर्मादाय आयुक्तालयात नोंद करण्यात आली. ज्या इमारतीमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचा कारभार चालविला. त्याच इमारतीसाठी आता भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष बघायला मिळणार हे नक्की.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा