इंदापूर तालुक्यातील लवटेवस्ती ते भोसले वस्ती रस्ता ”असुन अडचण नसुन खोळंबा”

इंदापूर, दि .६ सप्टेंबर २०२०: निमसाखर (ता.इंदापूर) येथील खंडोबानगर, लवटेवस्ती, दगडखाण, ते भोसले वस्ती वरुन रणगाव वालचंदनगर कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था म्हणजे ”असुन अडचण आणि नसुन खोळंबा” अशीच काहीशी झाली आहे.
     

लवटेवस्ती पासुन दगडखाण पर्यंतचा सुमारे दोन किलोमीटर तर पुढे दगडखाण चौका पासून भोसले वस्ती वरुन रणगावकडे जाणाऱ्या दोन किलोमीटर असा साधारण चार किलोमीटर रस्ता गेली अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. मात्र सध्या निमसाखरच्या माजी सरपंचाच्या वस्ती वरुनच हा रस्ता जात असल्याने या रस्त्याला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा नागरिकांमधुन व्यक्त करण्यात येत होती. मात्र निमसाखर ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने ग्रामपंचायतीवरती आता प्रशासकाची नियुक्ती झाली असुन सरपंच पदाच्या काळात ही सरपंचाच्या घरासमोरुनच जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने पुढिल काळात तरी या रस्त्याची दुरुस्ती होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
     

निमसाखर मधुन खंडोबानगर, लवटेवस्ती पासून दगडखाण चौकातून वालचंदनगर कडे तर पुढे भोसले वस्ती वरुन रणगावकडे जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असुन या परीसरात साधारण १५०० लोकांची लोक वस्ती आहे. मात्र या रस्त्याकडे गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. अगोदरच या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यातच या रस्त्या लगतच असलेल्या ओढ्यांमधुन हि मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असुन वाळू वाहतूकी मुळे हि या रस्त्याची पुर्ण पणे वाट लागली आहे.

”सदरील रस्त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सुचना करून अंदाजपत्रक तयार करून रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल.” – प्रमोद काकडे, सार्वजनिक बांधकाम सभापती – जिल्हा परिषद पुणे.  

न्यूज अन कट प्रतिनिधी- निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा